अभिमानास्पद! दूध विकून महिलेने मुलीला शिकवलं, मुलीने अशा प्रकारे फेडले आईचे उपकार, बनली ‘ही’ मोठी अधिकारी..

अभिमानास्पद! दूध विकून महिलेने मुलीला शिकवलं, मुलीने अशा प्रकारे फेडले आईचे उपकार, बनली ‘ही’ मोठी अधिकारी..

आपल्याकडे अनेकदा दहावी किंवा बारावीची परीक्षा झाल्यानंतर निकाल लागण्याच्या आधीच अनेक मुलं किंवा मुली हे पेपर अवघड गेला म्हणून आ’त्मह’त्येसारखा मार्ग स्वीकारत असतात. त्याचप्रमाणे अनेक जण परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कमी मार्क पडले म्हणून आ’त्मह’त्या करत असतात.

मात्र, या तरुणांना असे करणे योग्य नाही हे सांगणारी देखील लोक आता जास्त राहिले नाहीत. एखाद्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले तर पूर्ण आयुष्य बरबाद होते हा समज करून घेणे अतिशय चुकीचे आहे. कारण की अपयशातून यश हे मिळताना दिसते. अनेकदा अपयश आल्यानंतरही काबाडकष्ट करून यश मिळवता येते.

जर आपण दहावी किंवा बारावी मध्ये अनुत्तीर्ण झाल्यास मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला आपले शिक्षण हे पूर्ण करता येते. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन चांगले यश देखील मिळवता येते. मात्र, अनेक जण आत्महत्येसारखा मार्ग निवडतात हे अतिशय चुकीचे आहे.

अनेक तरूण तरूणी हे अतिशय खडतर परिस्थिती बदलून आयएएस आयपीएस सारख्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे आपण अनेकदा पाहिल असेल. दरवर्षी एमपीएससीचा निकाल देखील लागतो. या परीक्षेत अतिशय खडतर परिस्थितीतून अनेक जण वर येतात आणि यश मिळवतात. काहीजण एमपीएससी यूपीएससी या परीक्षेची तयारी खूप वर्षापासून करत असतात.

मात्र, त्यांना देखील यश मिळत नाही. मात्र, ग्रामीण भागातील युवक गेल्या काही वर्षापासून या परीक्षेत यश मिळतांना दिसत आहे. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशीच एक यशस्वी यशोगाथा सांगणार आहोत. ही घटना ही हिसार येथे घडलेली आहे. हिसार येथे दूध विकणाऱ्या एका महिलेच्या मुलीने आयएसएस म्हणजेच भारतीय सांख्यिकी सेवा यामध्ये देशातून बारावी रँक मिळवलेली आहे.

हिसार येथे राहणारी कल्पनाने हे यश मिळवलेले आहे. कल्पना हिच्या घरी तिने यश मिळाल्यानंतर खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. तिचे अभिनंदन करण्यासाठी लोक देखील खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसेच गावांमध्ये पूर्ण मिठाई वाटप केलेली आहे. कल्पना हिच्या आईने दूध विकून तिने आपल्या मुलांना मोठे केले आहे.

त्याचप्रमाणे कल्पना देखील आपल्या आईला मदत करत होती. कल्पना हीचे वडील हे पटवारी असून सीवानी मध्ये सध्या ते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे कल्पनाही चा भाऊ देखील अतिशय हुशार आहे. अतिशय खडतर परिस्थितीत त्याने एमबीबीएस पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे कल्पना हिचे आजोबा दयाराम हे एका गावाचे सरपंच देखील राहिले आहेत.

मात्र उभ्या आयुष्यात त्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाजासमोर आदर्श उभा केला होता. आता कल्पना हिच्या या यशाने तिचे सर्व जण कौतुक करत आहेत. भविष्यात देखील आपण असेच कार्य करत राहू, असे कल्पनाने सांगितले.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *