अन्न पचनाचा त्रास होतो, जेवण झाल्यावर करा ‘या’ पदार्थांचे सेवन, पहा होतील ‘हे’ जबरदस्त फायदे…

अन्न पचनाचा त्रास होतो, जेवण झाल्यावर करा ‘या’ पदार्थांचे सेवन, पहा होतील ‘हे’ जबरदस्त फायदे…

सध्याच्या जमान्यामध्ये घरातील जेवण करणे हे अतिशय कमी प्रमाणात झाले आहे. अनेकांना नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे सहाजिकच त्यांना बाहेरचे खावे लागते. हॉटेलमध्ये तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात असतात. तसेच त्यामध्ये सोडा टाकलेला असतो. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने अपचनाचा त्रास सुरू होतो. अपचन झाले की तुम्हाला इतर त्रास सुरू होतात.

बद्धकोष्टता हा त्याचाच एक भाग आहे. तसेच यामुळे इतर आजार देखील वाढीस लागण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरचे खाणे टाळावे. जर शक्य नसेल तर कमी प्रमाणात बाहेरचे खावे. तसेच हलका आहार घेतल्यावर तुम्हाला हा त्रास होणार नाही. आहारामध्ये फळे आणि सलाड यांचा समावेश करावा. आज आम्ही आपल्याला अशीच काही फळे सांगणार आहोत की, जी खाल्ल्याने आपल्याला अपचनाचा त्रास काही प्रमाणात का होईना कमी होतो.

१.सोप : सोप हा भारतीय पदार्थ मधील एक महत्त्वाचा घटक आहे. आपण ती कधीही खाऊ शकतो. सोपेचे फायदे अनेक असतात. सोप खाल्ल्यानंतर पचन क्रिया वाढीस लागते. जेवणानंतर नियमितपणे सोपेचे सेवन करावे. यामुळे अन्न चांगले पचते. तसेच याचा उपयोग मुखवास होण्यास देखील होतो.

२. दही: अनेकांना दही हा पदार्थ आवडत नाही. मात्र, सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणाआधी आपण नियमितपणे दही खावे. दही खाल्ल्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होणार नाही. तसेच दह्याचे इतर फायदा देखील आहेत. तुम्हाला ताजेतवाने होण्यासाठी देखील दही उपयोगाला येते.

३. पपई : पपई मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे भरलेले असतात. पपई खाल्ल्याने तुम्हाला अन्न पचन होण्यास मदत मिळते. तसेच पपईमध्ये इतर गुण देखील आहेत. पपई खाल्ल्याने तुमचा रक्तपुरवठा देखील सुरळीत राहण्यास मदत मिळते. तसेच पपई ने तुमचा अंगात तरतरी निर्माण होते. त्यामुळे नियमितपणे पपई आणि इतर फळाचे सेवन अवश्य करावे.

४. सफरचंद: सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक गुण असतात. नियमितपणे रोज एक सफरचंदाचे सेवन करावे. जर शक्य नसेल तर आठवड्यातून दोन सफरचंद तरी आपण खावे. यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत मिळते.

५. केळी : केळी मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे भरलेले असतात. त्यामुळे केळीचे से वन देखील आपण करावे. म्हणून त्यामुळे अन्नपचनास मदत होते.

६. चिया: या बिया या आपण खाल्ल्यास आपल्याला अपचनाचा त्रास होत नाही. या बिया बाजारात कुठेही सहज उपलब्ध होतात. याचे सेवन करून आपण पचनक्रिया मजबूत करू शकता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *