सुनेवर विश्वास नाही म्हणून सासू सासर्यांनी नातवाचा जन्म होताच केली DNA टेस्ट ! पण पुढे घडलं…

पोटात असलेलं बाळ आपलं आहे किंवा नाही, किंवा त्या बाळाचे आई-बाबा कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी DNA टेस्ट केली जाते. अनेक मालिकांमध्ये आपण हे चित्र पाहिले आहे.
केवळ हिंदी मालिकांमध्ये नव्हे तर आजकाल मराठी मालिकांमध्ये देखील या चाचणीचे नवीनच वेड लागलेले पाहायला मिळत आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतील मुख्य कलाकार दीपाच्या चा’रि’त्र्या’वर तिचा नवरा संशय घेतो.
आणि आपल्या पत्नीच्या पोटातील बाळ आपलेच आहे का याची खात्री करून घेण्यासाठी, डी एन ए टेस्ट करतो. त्यावेळी त्याची कोणतीतरी मैत्रीण ती टेस्ट बदलते. आणि आपल्या पत्नीच्या पोटातील बाळ आपले नाही, असा समज त्याचा होतो. त्यावरून त्या कथानकाला नवीन वळण मिळते.
सध्या अगदी रोमांचक वळणावरती ही मालिका येऊन ठेपली आहे. मात्र हे सर्व एका मालिकेचे चित्र आहे. आपल्या सर्वांचे मनोरंजन व्हावे यासाठी मालिकेमध्ये अशा प्रकारच्या रोमांचक वळणाची सवय आता रसिकांना झालेलीच आहे. त्यामुळे मालिकेमध्ये दाखवलेला हा मजकूर केवळ मालिकेमध्ये किंवा सिनेमांमध्ये असू शकतो, या काल्पनिक मजकुराला खऱ्या आयुष्यात कुठेही थारा नाही असा आपल्यापैकी अनेकांचा समज असतो.
मात्र असं खऱ्या आयुष्यात देखील होऊ शकते, अशी एक घटना नुकतीच सोशल मीडियावर समोर आली आहे. कोणाच्याही घरात, एखाद्या बाळाचा जन्म ही संपूर्ण कुटुंबासाठी अत्यानंदाची गोष्ट असते. बाळाचे आई-वडीलच नाही तर आजी-आजोबा यांच्यासाठी देखील ही अगदी आनंदाची बाब असते. आपल्या साथीला कोणीतरी येणार, आपल्याला गोष्टी सांगावे लागणार, यासाठी आजी आजोबा वेगवेगळी स्वप्न रंगवत असतात.
मात्र त्याच स्वप्नात भंग पडलेला समोर आलेला बघायला मिळाला आहे. हा अतिशय अजब प्रकार एका व्यक्तीने आपल्या क्रेड्डीटच्या अकाउंट वरन शेअर केला आहे. त्या व्यक्तीने सांगितले आहे की, त्याच्या आई-वडिलांना त्यांची सून सुरुवातीपासूनच पसंत नव्हती. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासूनच त्यांचा तिच्यासाठी नकार होता.
पण तेव्हा हे प्रकरण इतके जास्त गं’भीर वळण घेईल असा विचार त्याने देखील केला नव्हता. आत्ता ज्या वळणावरती हे प्रकरण आले आहे, याचा विचार स्वप्नात देखील त्या व्यक्तीने केला नव्हता. त्या व्यक्तीच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पण तरीही तिचे सासू-सासरे मात्र नाखूष आहेत. ते तिला अजूनही पसंत नाही करत तर आता मात्र तिचा अधिकच ति’र’स्कार करत आहेत.
त्याच्या उत्तरात आपली व्य’था मांडताना एका अमेरिकन व्यक्तीने सांगितले की, त्याच्या पत्नीचे नाव सोन्या असे असून ती एका मोठ्या हॉटेलांमध्ये वेटर्स च काम करते. बराच प्रयत्न करून देखील ती या व्यक्ती सोबत लग्न करण्यास तयार होत नव्हती. पण अखेरीस माझे खरे प्रेम तिला समजले आणि सोन्याने माझ्यासोबत लग्न करण्यास होकार दिला.
मी तिला आणि माझ्या घरच्यांना भेटवलं तर त्यांनी पहिल्याच भेटीत तिला रिजेक्ट केलं. त्यांना असे वाटत होते की, ही मुलगी केवळ ग्रीन कार्ड साठी आपल्या मुलाचा वापर करत आहे. मात्र माझे तिच्यावर खरे प्रेम होते म्हणून आम्ही लग्न केले. लग्नानंतर आई-वडिलांनी या जोडप्याला आशीर्वाद देखील दिला नाही.
त्यामुळे त्यांच्या उपस्थिती शिवायच त्या दोघांनी लग्न केलं आणि वेगळा संसार थाटला. लग्नानंतर दोन वर्षांनी कपलच्या घरी बाळाचा जन्म झाला. त्या नंतर मुलाच्या आई-वडिलांनी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला. त्या दरम्यान त्यांनी म्हणजेच नवजात बाळाच्या आजी-आजोबांनी मुलाचे डी एन ए टेस्ट देखील करून घेतली. त्यांना सोन्या वरती विश्वास नव्हता.
त्यामुळे त्यांनी ही टेस्ट करून तो त्यांचाच नातू आहे अशी खात्री करून घेतली. या सर्व प्रकरणावर जेव्हा त्या अज्ञात व्यक्तीने आपल्या आईला प्रश्न केला तेव्हा ती उत्तरली, तिला पहायचं होतं की हे बाळ नक्की त्याचंच आहे का. या घटनेनंतर कपलने आपल्या छोट्या बाळाला त्याच्या आई वडिलांची भेटावं पूर्णपणे बंद केलं होतं.
त्यामुळे नाण्याची केवळ एकच बाजू नसते प्रत्येक वेळी नाण्याची दुसरी बाजू देखील बघावी, अशी विनंती त्या अज्ञात व्यक्तीने देखील केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या दोन व्यक्तींचा सपोर्ट केला आहे, आणि त्यांना अगदी बरोबर ठरवले आहे.