अण्णा नाईकच नाही तर प्रेक्षकांनाही भुरड घालतेय नवी बोल्ड शेवंता, फोटो पाहून चकित व्हाल….

अण्णा नाईकच नाही तर प्रेक्षकांनाही भुरड घालतेय नवी बोल्ड शेवंता, फोटो पाहून चकित व्हाल….

काही मालिका थेट चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. उत्तम कथानक आणि दिग्दर्शनासोबतच त्यामधील कलाकारांचा उत्तम अभिनय देखील त्या मालिकांच्या यशासाठी महत्वाचा ठरलेला असतो. या मालिका जेव्हा सुपरहिट ठरतात तेव्हा त्यामधील सर्व पात्र देखील तेवढेच प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरलेले असतात.

त्यामुळे त्या पात्रांमध्ये इतर कोणाला बघणे चाहत्यांना बघायला आवडत नाही. अनेकवेळा आपण पहिले आहे की, एखादा कलाकार काही कारणास्तव मालिका सोडतो आणि दुसरा कलाकार त्यांची जागा घेतो. पण त्यानंतर चाहते त्या मालिकेला पाहिजे तशी प्रतिक्रिया देत नाहीत. आता अजून एका मराठी मालिकेमधून एक लोकप्रिय कलाकार एक्झिट घेत असून तिच्याजागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.

मात्र अनेक चाहत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केल्याचे बघायला मिळत आहे. मराठी थरारक मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ च्या पहिल्या पर्वाला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या मालिकेमधील सर्वच पात्र लोकप्रिय ठरले. त्यामध्ये शेवंता हे पात्र तर प्रचंड लोकप्रिय झाले होते. शेवंताच्या अदांवर, तिच्या लूकवर चाहते घायाळ झाले होते.

त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. पहिल्या पर्वाला चांगली लोकप्रियता मिळाली म्हणून मेकर्स दुसरे पर्व घेऊन आले. दुसऱ्या पर्वाला देखील चाहत्यांनी भरगोस प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच मेकर्स तिसरे पर्व घेऊन आले. शेवंताची भूमिका अपूर्वा नेमळेकरने साकारली होती. अपूर्वाचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

मात्र आता अपूर्वाच्या जागी कृतिका तुळसकर नवीन शेवंता म्हणून बघायला मिळणार आहे. कृतिकाने यापूर्वी अनेक मराठी मालिकांमध्ये आणि सिनेमामध्ये काम केले आहे. विजेता, बबन, पाशबंध सारख्या मराठी सिनेमामध्ये कृतिका झळकली होती. त्यामध्ये तिच्या पात्राला चांगलीच लोकप्रियता देखील मिळाली होती. मात्र आता शेवंता म्हणून तिला चाहत्यांचे मन जिंकता येईल का, हा मोठा प्रश्न आहे.

शेवंता म्हणून अपूर्वाला बघण्याची सवय तिच्या चाहत्यांना झाली आहे, त्यामुळे आता कृतिकाला शेवंता बनण्यासाठी चांगलेच कष्ट घ्यावे लागणार हे नक्की. अपूर्वाने मालिका का सोडली, याबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नाहीये. पण कोणत्या कारणामुळे अपूर्वाने हा निर्णय घेतला असा प्रश्न चाहते सोशल मीडियावर विचारत आहेत.

त्यातच, कृतिकाचा शेवंताच्या लूकमधला एक फोटो शेअर करण्यात आला आहे.’आजपर्यंत घायाळ केले, आता जी’वच घेईल,’ असं कॅप्शन टाकत मेकर्सने हा फोटो शेअर केला आहे. मात्र यावर अनेक चाहते चांगलेच नाराज झाल्याचे बघायला मिळत आहेत.

अनेकांनी चांगल्याच सं’तप्त प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. ‘अरे ही कोणती शेवंता? मेकर्सचं डोकं फिरलं आहे काय?’ असं एका चाहत्याने बोलले आहे. ‘अपूर्वा म्हणजेच शेवंता आणि शेवंता म्हणजेच अपूर्वा,’ असं अजून एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे कृतिकाला आता शेवंताच्या रूपात चाहते स्वीकारतात की नाही हे मालिकेचा भाग प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *