अंघोळ करताना बाथरूम मधील ‘या 5’ सवयी ठरू शकतात घातक ! जाणून घ्या

अंघोळ करताना बाथरूम मधील ‘या 5’ सवयी ठरू शकतात घातक ! जाणून घ्या

बाथरूममधील अनेक चुकीच्या सवयी शरीरासाठी हानिकारक ठरतात. याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

1) टूथब्रश योग्य वेळी बदला – टूथब्रशचा वापर करण्याआधी आणि नंतर त्याची चांगली स्वच्छता करा. याशिवाय ठराविक दिवसांनंतर टूथब्रश बदलायला हवा.

2) ओला टॉवेल – अनेकजण टॉवेलचा वापर केल्यानंतर तो तसाच बाथरूममध्ये ठेवतात किंवा विसरतात. तो टॉवेल तसाच म्हणजे ओलाच असतो. दुसऱ्या दिवशीही ते तोच टॉवेल वापरतात. दररोज स्वच्छ आणि सुकलेला टॉवेलचा वापरा.

3) बाथरूममध्ये फोनचा वापर – बाथरूममध्ये फोनचा वापर करू नका. कारण तेथील बॅक्टेरिया फोनवर येतात किंवा त्यातील छिद्रांमध्ये येतात आणि नंतर ते शरीरात जाऊ शकतात जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

4) बॉडीस्क्रबर – अनेकजण बॉडीस्क्रबर वापरतात. परंतु काही दिवसांनंतर बॉडी स्क्रबर बदलणंही गरजेचं आहे. नाही तर त्वचेसंदर्भात आजार होऊ शकतात.

5) बाथरूम स्वच्छ ठेवा – रोज वापर केल्यानंतर बाथरूमदेखील स्वच्छ धुवून काढा. यासाठी बाजारात काही प्रॉडक्ट्स आहेत त्यांचा वापर करा जेणेकरून ते निरोगी राहिल.

बाथरूममध्ये जातो एवढा वेळ

एका रिसर्चनुसार पुरुष 373 दिवस म्हणजे दिवसाला 23 मिनिटे आणि महिला 456 दिवस म्हणजे दिवसाला 29 मिनिटे बाथरूममध्ये घालवतात. बाथरूममध्ये खूप शांतता आणि आराम मिळतो. हेच कारण आहे की, तिथे अनेक नवीन आयडियादेखील सुचतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *