अंघोळ करताना बाथरूम मधील ‘या 5’ सवयी ठरू शकतात घातक ! जाणून घ्या

घरामधील बाथरूम असे ठिकाण आहेत की ज्यांचेशिवाय प्रत्येकाचे दिवसाची सुरुवात होत नाही. झोपेतून उठल्यावर पहिली आठवण येते ती बाथरूमची. काही काही लोकांचे घरात दोन दोन बाथरूमची सोय असते तर बहुतेक लोकांचे घरात एकच बाथरूम असते.
घरात जर मेम्बर जास्त प्रमाणात असतील आणि बाथरूम ची संख्या एकच असेल तर तेव्हा बाथरूम चा वापर अधिक प्रमाणात होत असतो. कारण प्रत्येक व्यक्तीला बाथरूम मध्ये सकाळी अंघोळीला जावेच लागते. त्यात महत्वाची गोस्ट म्हणजे बाथरूमच्या स्वच्छतेची.
घरातील असे काही सदस्य असतात की त्यांना अंघोळीसाठी भरपूर वेळ लागतो तर काही सदस्य चटदिशी बाथरूम मधून अंघोळ करून बाथरूम दुसऱ्या सदस्यासाठी रिते करून देतात. विशेष करून घरातील तरुण बाथरूम अधिक वेळ अडकवून ठेवतात. आज आपण बाथरूम मधील काही वाईट सवयी बद्धल चर्चा करणार आहोत.
घरातील ठराविक काही सदस्यांकडून बाथरूम मध्ये काही चुकीच्या सवयीचे अनुकरण केले जाते. बाथरूममधील या अनेक चुकीच्या सवयी घरातील सदस्यांचे शरीरासाठी हानिकारक ठरतात. म्हणून या वाईट सवयी घरातील सर्वच सदस्यांनी बदलायला हव्या. याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
1) टूथब्रश योग्य वेळी बदला – घरातील प्रत्येक सदस्याचा वेगळा असा टूथब्रश असतो. टूथब्रशचा वापर करण्याआधी आणि नंतर त्याची चांगली स्वच्छता करने आवश्यक व गरजेचे आहे. त्यानंतर एकच टूथब्रश जास्त काळ वापरणे देखील घातक ठरू शकते. याशिवाय ठराविक दिवसांनंतर टूथब्रश बदलायला हवा.
2) ओला टॉवेल – अंघोळ करताने टॉवेल प्रत्येकाला आवश्यकच आहेत. अनेकजण टॉवेलचा वापर केल्यानंतर तो तसाच बाथरूममध्ये ठेवतात किंवा विसरतात. तो टॉवेल तसाच म्हणजे ओलाच असतो. दुसऱ्या दिवशीही ते तोच टॉवेल वापरतात. दररोज स्वच्छ आणि सुकलेला टॉवेलचा वापरल्याने आपल्या शरीरास कोणतीही हानी पोहचत नाही.
3) बाथरूममध्ये फोनचा वापर – बऱ्याच तरुण तरुणींना बाथरूममध्ये फोन घेऊन जाण्याची वाईट सवयी असते. बाथरूममध्ये फोनचा वापर करने अतिशय हानिकारक आहे. बाथरूम मध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया असतो. आणि तेथील बॅक्टेरिया फोनवर येतात किंवा त्यातील छिद्रांमध्ये येतात आणि नंतर ते शरीरात जाऊ शकतात. जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
4) बॉडीस्क्रबर – बाथरूम मध्ये अंघोळीला गेलेनंतर अनेकजण बॉडीस्क्रबरचा जास्त प्रमाणात वापर करतार. बॉडीस्क्रबरचा वापर करणे वाईट नाही. परंतु एकच बॉडीस्क्रबर जास्त दिवस वापरणे योग्य नाही. काही दिवसांनंतर बॉडी स्क्रबर बदलणंही गरजेचं आहे. नाही तर त्वचेसंदर्भात आजार होऊ शकतात.
5) बाथरूम स्वच्छ ठेवा – बाथरूम मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाथरूम स्वछ असायला हवे. बाथरूम मध्ये अंघोळीला लागणाऱ्या आवश्यकच वस्तू ठेवणे गरजेचे आहेत. बाथरूमच्या रोजच वापर होत असल्याने रोज बाथरूमचा वापर केल्यानंतर बाथरूम देखील स्वच्छ धुवून काढने आवशयक आहेत. यासाठी बाजारात काही प्रॉडक्ट्स आहेत त्यांचा वापर करा जेणेकरून बाथरूम नेहमीच निरोगी राहिल.
बाथरूममध्ये का जातो एवढा वेळ ?
एका रिसर्चनुसार पुरुष 373 दिवस म्हणजे दिवसाला 23 मिनिटे आणि महिला 456 दिवस म्हणजे दिवसाला 29 मिनिटे बाथरूममध्ये घालवतात. बाथरूममध्ये खूप शांतता आणि तिथे अनेक गोष्टी करण्यास उद्युक्त होतात ज्याने आराम मिळतो. हेच कारण आहे की, बाथरूम मध्ये एकांत मिळतो व तेथे अनेक नवीन आयडियादेखील सुचतात.